Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू; दोन जण गंभीर जखमी.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

{संपादकीय}

*बीड-* सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील

बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एका भरधाव कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडलं आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या सहा लोकांना जोरदार धडक दिली. या धडकेत चौघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.


प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व लोक पेंडगाव येथे देव दर्शनासाठी जात होते. मात्र वाटेतच त्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. या मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस अपघातग्रस्तांची ओळख पटवत आहेत. या अपघातामुळे सोलापूर धुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.



Post a Comment

0 Comments