Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून वहिनीची हत्या; फरार दिराला नेपाळ सीमेवरून अटक.

 


प्रतिनिधी | कल्याण

कल्याणमधील हद्दीत वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या वादात दिरानेच आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गुड्डू देवी आणि आरोपी दिर बमबम कुमार यांच्यात अनैतिक संबंध होते. काही दिवसांपासून गुड्डू देवी यांनी आरोपीशी बोलणे बंद केल्याने बमबम कुमार संतप्त झाला होता. याच रागातून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि आरोपीने गुड्डू देवी यांचे डोके भिंतीवर आपटले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला ही घटना अपघाती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र पोलिसांच्या तपासात हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर आरोपी बमबम कुमार झारखंडला पळून गेला होता आणि तेथून नेपाळमध्ये फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून नेपाळ सीमेवर पोहोचण्यापूर्वीच आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments