Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

🚨 बापुगाव अपघातात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू! साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला; परिसरात शोककळा!

 


📍 बापुगाव, ता. डहाणू | प्रतिनिधी - शंकर गायकवाड 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बापुगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातामुळे आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींवर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना ग्रामपंचायत बापुगावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावकऱ्यांनी “हाक हरपली, आठवणी कायम...” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

या भीषण घटनेमुळे संपूर्ण डहाणू तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments