Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रमध्ये संघटन विस्ताराला वेग, सिद्धार्थ बोर्डे यांची मध्य शहराध्यक्षपदी तर राहुल खरात यांची पूर्व शहराध्यक्षपदी नियुक्ती.

 


कार्यकारी संपादक : रितेश साबळे

छत्रपती संभाजीनगर (दि. १९ मे) : व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅनॉट पॅलेस परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास पक्षाचे प्रमुख नेते राजुभाई साबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.


या कार्यक्रमात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये सिद्धार्थ बोर्डे यांची ‘मध्य शहराध्यक्ष’पदी, तर राहुल खरात यांची ‘पूर्व शहराध्यक्ष’पदी निवड करण्यात आली. तसेच अनिल पोतदार, कुणाल खरात, तुषार गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, राहुल शिंदे, सुनील वाहूळ यांच्यासह अनेक युवकांचा पक्षात जाहीर प्रवेश करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.


कार्यक्रमाची सुरुवात पक्षाचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती यांनी मानले.


यावेळी राज्य सहसचिव वैभव लोखंडे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, जिल्हा सचिव रवी मोरे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, सुरेश कांबळे, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष संतोष उनवणे, विजय सोनवणे, गणेश बोर्डे आणि राजकुमार साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments