वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी:शंकर गायकवाड
किन्हवली पोलिसांना मोठे यश मिळाले असून, घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल ₹7,30,960/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दिनांक १५/१०/२०२४ रोजी किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरपाडा (ढाडरे) (ता. शहापूर, जि. ठाणे) येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोने, चांदी व रोकड असा मोठा ऐवज चोरला होता. या गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यानंतर किन्हवली पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिस पथकाने तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपींचा मार्ग काढला. अखेर सहा आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमालाचा तपशील:
11 तोळे सोनं व विविध दागिने
मोबाईल हॅण्डसेट, रोकड रक्कम
1 मोटारसायकल व 1 दुचाकी वाहन
एकूण किंमत — ₹7,30,960/-
अटक आरोपींची नावे:
१) जयेश बाळु जमदरे, वय-३१ वर्षे, रा-मु. गुंडयाचापाडा, पो-खरीवली, ता- शहापुर, जि ठाणे.
२) नितेश लहु देसले, वय २१ वर्षे, रा-मु. गुंडयाचापाडा, पो-खरीवली, ता- शहापुर, जि ठाणे.
३) सिध्दार्थ बाळकृष्ण केदार, वय-२० वर्षे, रा-मु. नारायणगांव, ता-शहापुर, जि-ठाणे
४) समिर नजिर शेख, वय-१९ वर्षे, रा- मु.सापगांव, पो खुटघर, ता-शहापुर, जि-ठाणे.
५) अभय भगवान हरड, वय-२४ वर्षे, रा खरीवली (सरलांबे), पो-आवरे, ता-शहापुर, जि-ठाणे
६) विनय विष्णू लुटे वय-२६ वर्षे रा.मु.पो. अघई ता. शहापूर जि.ठाणे.
या यशस्वी कारवाईत सहभाग:
किन्हवली पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी नितीनजी खैरनार, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढवळे, पोलिस हवालदार राठोड, पवार, बडेराव, कांबळे कंठे,शिरोळे, पाटील, ढोरे, शिंदे, आदींचा समावेश होता.
अधिक माहिती:
पोलिस तपासात आरोपींच्या ताब्यातून विविध सोन्याचे दागिने, मोबाईल हॅण्डसेट, रोकड आणि वाहन जप्त करण्यात आले असून आरोपींविरोधात पुढील तपास सुरू आहे.



Post a Comment
0 Comments