Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कुऱ्हाडी येथे दुर्दैवी घटना : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️

परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज चव्हाण

जिंतूर (प्रतिनिधी) : जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारात गुरुवार, दिनांक ३० ऑक्टोबर रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


मयत झालेल्या बहिणींची नावे पूजा परमेश्वर चव्हाण (वय २० वर्षे) आणि संध्या परमेश्वर चव्हाण (वय १७ वर्षे) अशी आहेत. दोघीही कुऱ्हाडी गावातील रहिवासी होत्या. कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्यानंतर पाय घसरल्याने त्या दोघी पाण्यात बुडाल्या.


घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कोंडीराम चव्हाण (सेना दलातील जवान) यांनी जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेत शोध मोहीम सुरू केली. त्यात पूजा चव्हाण हिचा मृतदेह मिळाला. संध्या चव्हाणला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने संध्याकाळी दहा वाजता तिचाही मृत्यू झाला.


या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही बहिणींच्या मृत्यूमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.



Post a Comment

0 Comments