Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे खुलताबाद येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे संपन्न “कार्यकर्ताच चळवळीचा आणि पक्षाचा मुख्य कणा” – राजूभाई साबळे

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक रितेश साबळे

खुलताबाद (प्रतिनिधी) – दिनांक 31 ऑक्टोबर 2025, शुक्रवार रोजी खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्यावतीने भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरात पक्षाचे प्रमुख राजूभाई साबळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “कार्यकर्त्यांच्या जीवावरच पक्ष संघटना मोठ्या झाल्या आहेत, मात्र अनेकांनी स्वार्थासाठीच कार्यकर्त्यांचा वापर केला आहे. त्यामुळे आजच्या कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करणार आहोत.”


ते पुढे म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी केवळ एका समाजापुरते मर्यादित न राहता व्यापक स्वरूपात लोकहिताचे कार्य करावे. कारण चळवळीचा आणि पक्षाचा मुख्य कणा हाच कार्यकर्ता असतो.”


शिबिरात राज्य उपाध्यक्ष (विधीतज्ञ) अॅड. अविनाश थिट्टे यांनी पक्षाच्या बांधणी, विचार, नियोजन, त

सेच शिव–फुले–शाहू–आंबेडकर विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक दिशा दिली.


तसेच राज्य सचिव सुरेश शिनगारे यांनी सांगितले की, “येणाऱ्या काळात पक्षाला मोठी भरारी मिळवण्यासाठी सर्वांना एकत्र आणून शोषित, पीडित व वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.”



या प्रसंगी शहराध्यक्ष रणजित मनोरे आणि युवा शहर कार्याध्यक्ष जहीर शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी उत्साह वाढविला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा उपनेते जयनाथ बोर्डे, सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष रणजित मनोरे यांनी केले.


या वेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, तालुका अध्यक्ष मंगेश कसारे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, राजकुमार अमोलिक, आर.पी.एम. ऑटो युनियन शहराध्यक्ष प्रदीप धनेधर, अनिस गंगापूरकर, विजय सदावर्ते, शाहिद लखपती, अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी भोजन व चहापाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

शिबीर यशस्वी करण्यासाठी विशाल मनोरे, विजेंद्र खरात, रोहित चौथमल, आकाश माघाडे, विनायक लव्हे, संतोष साळवे, राहुल पवार, कुणाल मनोरे, कडुबा म्हस्के, के. के. कुलकर्णी, नितेश तांगडे, अनिल अलकुंडे, सिद्धार्थ साळवे, राहुल फटाकडे, शाकीर जे. के., कलीम पटेल, नौशाद (हाजी) लखपती आदींनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments