Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पितळखोरा लेणी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न; राज्यभरातून अडीचशे अभ्यासकांचा सहभाग.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

मोहन दिपके 

राष्ट्रीय ख्यातीचे लेणी अभ्यासक आणि लेणी संवर्धन चळवळीचे प्रवर्तक सुरज रतन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पितळखोरा लेणी अभ्यास दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांप्रमाणेच पितळखोरा हीही लेणी त्याच डोंगररांगेत असून सुमारे सव्वा दोन हजार वर्षांपासून खोल दरीत उभी आहे. महामार्गापासून थोडी दूर असल्याने दुर्लक्षित राहिलेल्या या लेणी समूहात दुमजली कोरीव शिल्पकला, अलंकारिक हत्ती, उडते यक्ष-गंधर्व, मोठे चैत्य विहार ही वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. चैत्य विहारातील एका खांबावर पैठणच्या व्यक्तीने दिलेल्या दानाचा शिलालेख आहे.


या अभ्यास दौऱ्यात राज्यभरातून जवळपास अडीचशे लोक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भन्तेजी, बुद्धाचार्य, सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी-कर्मचारी, वकील, अभियंते, इतिहास अभ्यासक, पत्रकार अशांचा विशेष सहभाग होता. मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, वाशिम, हिंगोली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, नाशिक जिल्ह्यातून लोक सहभागी झाले.


दौऱ्यापूर्वी कालीमठ फाट्यावर दिशादर्शक नामफलकाचे अनावरण करण्यात आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा अभ्यास दौरा सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला. दिवसभर सुरज जगताप यांनी सर्व शिल्प, स्थापत्य व खुणांचे मार्गदर्शन केले.


या वेळी बीड येथील दुर्ग अभ्यासक कचरू चांभारे, अंकुश निर्मळ, शाम दामुरडे, कल्याण घोलप, गणेश धोंडरे, गणेश नाईकवाडे आदी सहभागी झाले. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी आयोजक कचरू चांभारे, गंगाप्रसाद पाईकराव, अरूणाताई इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शिवाजी गाडे, विवेक वाघमारे, बाबासाहेब थोरात, विवेक मोरे, पत्रकार पगारे, आयु.वैभव पवार, ॲड.राकेश निकम, ॲड.निलेश निकम, चाळीसगावचे भारत मलकवाडे यांनी नियोजनात सहकार्य केले.



Post a Comment

0 Comments