वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
गणेश आहिरे
वासिंद - वासिंद पूर्व विभातील मोरदेवनगर रेल्वे कॉलनीतील एकमेव नावाजलेले व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणारे श्री. स्वामी समर्थ मित्रमंडळ यांना यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून मंडळ २६व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक गावडे, पदाधिकारी शांताराम धामणे, राहुल दोंदे, अनिल बेलवले, संतोष चांदकोटे, चेतन पष्टे, विनोद राठोड, सागर वाघचौडे तसेच नवीन कार्यकारिणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
👉 वासिंदकरांसाठी हा नवरात्री उत्सव आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक सोहळ्यांचा पर्वणीसमान ठरणार आहे.



Post a Comment
0 Comments