[वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क]
प्रतिनिधी- आनंद भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन मुंबई मंडळाच्या इगतपुरी शाखेच्या वतीने आज दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता एन.आर.एम.यू. कार्यालय, इगतपुरी येथे सेवानिवृत्त कामगारांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी काॅ. व्ही. आनंदन (महामंत्री, मुख्यालय) व काॅ. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ) यांनी प्रतिमांना अभिवादन केले.
या बैठकीस शंभर ते दीडशे सेवानिवृत्त कामगार (महिला व पुरुष) मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना काॅ. व्ही. आनंदन यांनी आठव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी सेवानिवृत्त कामगारांना एकत्र येऊन सरकारविरोधी लढा उभारण्याचे आवाहन केले. तर काॅ. जे. एन. पाटील यांनी उपस्थितांना फेडरेशनच्या सभासदत्वाची माहिती देत सांगितले की, “प्रत्येक सेवानिवृत्त कामगाराने फेडरेशनचा सभासद व्हावे. वार्षिक वर्गणी रु. ३०० आणि कायमस्वरूपी वर्गणी रु. ३००० आहे.”
बैठकीदरम्यान काॅ. नारायण सोनवणे (उपाध्यक्ष, मुंबई मंडळ), काॅ. वसंत कासार (ऑर्गनायझेशन सेक्रेटरी, मुंबई मंडळ), काॅ. आनंदा भालेराव (सचिव, मुंबई मंडळ), काॅ. राजू जगताप (अध्यक्ष, कर्जत-नेरळ शाखा), काॅ. अनंत लगड (सचिव, वासिंद शाखा), काॅ. अहमद खान (सचिव, इगतपुरी शाखा) यांनीही सेवानिवृत्त कामगारांना मार्गदर्शन केले.
तसेच काॅ. दिलीप शिंदे (ऑर्गनायझेशन सेक्रेटरी, कसारा शाखा), काॅ. नंदू बोंडवे (अध्यक्ष, वासिंद शाखा) आणि काॅ. अशोक महाजन (खजिनदार, वासिंद शाखा) हेही बैठकीस उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी काॅ. मधुकर कडू (अध्यक्ष, इगतपुरी शाखा) यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून बैठक संपन्न झाल्याची घोषणा केली.
बैठकीच्या शेवटी काॅ. वेणू पी. नायर (महामंत्री, जीके) यांच्या नेतृत्वाखाली “लाल सलाम”, “एन.आर.एम.यू. जिंदाबाद”, “ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद”, “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही” अशा जोशपूर्ण घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.



Post a Comment
0 Comments