वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
हिंगोली (प्रतिनिधी) — लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अँटी करप्शन ब्युरो कार्यालय हिंगोली तर्फे “दक्षता जनजागृती सप्ताह 2025” हा उपक्रम उत्साहात सुरू आहे. हा सप्ताह 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जात असून, या कालावधीत नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे व पोलीस उपअधीक्षक श्री. विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ब्युरोच्या टीमने शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्थानके तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये भेट देत नागरिकांना पत्रके वाटली. या जनजागृतीतून लोकांना आवाहन करण्यात आले की, शासनाच्या कोणत्याही कामासाठी जर कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी शासनाच्या निर्धारित शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैशाची मागणी करत असेल, तर नागरिकांनी न घाबरता तत्काळ अँटी करप्शन ब्युरो कार्यालय, हिंगोली येथे तक्रार नोंदवावी.
या तक्रारीदरम्यान तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल तसेच संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करून दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आवाहन करण्यात आले. या उपक्रमाची माहिती पोलीस हवालदार श्री. गजानन पवार यांनी दिली.




Post a Comment
0 Comments