Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भिवंडी : शेतात कामाला गेलेल्या ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहर गायकवाड

भिवंडी (प्रतिनिधी) – भिवंडी तालुक्यातील चावेभरे गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गावातील ६५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मंगळवारी दुपारी सदर महिला शेतावर काम करण्यासाठी गेली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरा गावाशेजारील शेतात तिचा मृतदेह अर्धवस्त्रावस्थेत आढळून आला. महिलेच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाण झाल्याचे आढळले असून, घटनास्थळी दगडही पडलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात, अज्ञात आरोपींनी महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.


तपास अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या अंगावर सुमारे ५ ते ६ तोळे सोने जसेच्या तसे असल्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झालेली नसून, अत्याचार उघड होऊ नये म्हणून आरोपींनी तिची निर्घृण हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.


या घटनेनंतर चावेभरे गावात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.


गणेशपुरी उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) यांनी सांगितले की, “हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले असून, आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल.”



Post a Comment

0 Comments