औरंगाबाद | प्रतिनिधी:-आनंदा भालेराव
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या करुणा मेधानंद जाधव यांनी दणदणीत विजय संपादन केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत जाधव यांना एकूण ७ मते मिळाली आणि त्यांनी सभापती पदावर विजयाची मोहर उमटवली.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, AIMIM आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी चार-चार मते असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, करुणा मेधानंद जाधव यांना अतिरिक्त पाठिंबा मिळाल्याने त्यांना सात मते मिळाली आणि त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत सभापती पद पटकावले.
या विजयामुळे औरंगाबाद महानगरपालिकेच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विजयाची अधिकृत घोषणा होताच औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत करुणा मेधानंद जाधव यांचे अभिनंदन केले. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि आनंदोत्सवाने परिसर दणाणून गेला.

Post a Comment
0 Comments