Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

गुरुपौर्णिमेनिमित्त मनसेकडून ९०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप.

टिटवाळा | प्रतिनिधी :-आनंदा भालेराव 

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टिटवाळ्यातील KNT पब्लिक स्कूल येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या सुमारे ९०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच शाळा व्यवस्थापनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे मुख्य आयोजन ॲड. अविनाश शिळकंदे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना) आणि दिलीप राठोड (विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सैनिक) यांनी केले. या दोन्ही मनसे पदाधिकाऱ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक उल्हास दादा भोईर, कार्याध्यक्ष रोहन अक्केवार, महिला शहर संघटक माधवी शेट्ये, विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष (शहापूर) पायल शाह तसेच प्रियांका देठे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी KNT पब्लिक स्कूलचे संचालक सतीश तिवारी, मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments