वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मुरबाड च्या पिंपळघर येथील २३ वर्षीय छकुली केदार हिची संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल.
मुरबाड तालुक्यातील धसई परिसरातील पिंपळघर येथील वडापाव [वेक्रेता कु्टंबाची एकुलती ता एक मुलगी, अँकेडमी पूर्ण केलेली २३ वर्षीय छकुली बाळकृष्ण केदार हिने अडीच महिन्यांपूर्वी थाटामाटात केलेल्या लग्नानंतर हुंड्याच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून तिची हत्या केली आहे, असा आरोप तिच्या आईने केला आहे. याप्रकरणी ४ सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पती कैलास हरड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१ मे २०२५ रोजी छकुली केदार हिचे लग्न खरवली (ता. शहापूर) येथील कैलास चंद्रकांत हरड या कपड्याच्या दुकान चालवणान्या तरुणाजी संपन्न झाले होते. कैलासचे कुटुंब सध्या गुरुकुलनगर, किन्हवली येथे राहते. लग्नाला अवघे अडीच महिने होत नाही तोच,छकुलीच्या मृत्यूने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
छकुलीच्या आई रंजना केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, छकुलीच्या सासरच्या लोकांनी तिला सतत २० लाख रुपयांचा हुंडा आणण्याची अशी मागणी करत शारीरिक व मा्नसिक छळ केला "नवीन रूम घ्यायची आहे, पैसे पाठव" या कारणावरून छकुलीला सातत्याने त्रास दिला जात होता. वडील वडापावची हातगाडी चालवत असताना एवढे पैसे आणणे जञक्य नव्हते. दोन दिवसांपूर्वी छकुलीने आईला फोन करून "मला घरी घेऊन जा, आता हे सहन होत नाही" असे हताइपणे सांगितले दैवाने १३ जुलै रोजी दुपारी २ः२६ 'वाजता, गुरुकुल नगर येथील राहत्या घरात, छकुलीने पंख्याला साडी बांधून आत्महत्या केली. मात्र केदार कुटुंबाचा ठाम आरोप आहे की, "ही आत्महत्या नाही, सासरच्यांनी छळ करून तिला मारून टाकले आहे. तिचा छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे."या प्रकरणी केन्हवली पोलीस ठाण्यात छकुलीचा पती कैलास चंद्रकांत हरड, सासू रमाबाई हरड, दिर राजेश हरड व जाऊ जयश्री हरड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कैलास हरडला अटक करण्यात आली आहे, इतर तिघे सध्या फरार आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.


Post a Comment
0 Comments