💥💥 ब्रेकींग बातमी
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
मुंबई-मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची दुर्देवी घटना घडली आहे. रात्री दोन वाजताच्या सुमारास एका घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मृतांमध्ये सुरेशचंद्र आणि शालू मिश्रा या बापलेकीचा समावेश आहे, तर मायलेक आरती आणि ऋतुराज मिश्रा जखमी झाले आहेत. याशिवाय आजूबाजूच्या घरातील दोघा जणांनाही दुखापत झाली आहे. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे विक्रोळीतील पार्कसाईट या डोंगराळ परिसरात दरड कोसळली. पार्कसाईट या परिसरातील डोंगरावर मोठी झोपडपट्टी आहे. याठिकाणी डोंगरावर अनेक घरे आहेत. अनेक भागांमध्ये संरक्षक भिंत बांधूनही प्रत्येक पावसाळ्यात याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. शनिवारी पहाटे ही भीती खरी ठरली.
या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबीयांचे घर दरडीखाली गाडले गेले. यामध्ये मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बचावकार्य हाती घेतले असून चौघा जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आजूबाजूची घरं रिकामी करण्याचे काम सुरु आहे. मुंबई महापालिकेने डोंगर किनाऱ्यावरील भाग धोकादायक असल्यामुळे येथील घरात न राहण्याची नोटीस मिश्रा कुटुंबाला बजावली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.


Post a Comment
0 Comments