Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग ठप्प; आंबा घाटातील दरड हटविण्यास युद्धपातळीवर प्रयत्न.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

🟣 आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प


👉 ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाईमुळे दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच

👉 वाहचालकांमध्ये प्रचंड असंतोष; प्रशासन अलर्ट


रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट दख्खनजवळ आज सकाळी पुन्हा एकदा दरड कोसळली असून दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घटनास्थळी पाच यंत्रांच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू आहे.


मागील चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने उग्र रूप धारण केले असून, महामार्ग रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या कटाईमुळे डोंगराचा उरलेला भाग सतत कोसळत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहतूकदार धास्तावले आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.


सततच्या पावसामुळे दरड हटविण्याच्या कामात अडथळे येत आहेत. तहसीलदार व पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, युद्धपातळीवर काम सुरू आहे.




Post a Comment

0 Comments