वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मोहन दिपके
हिंगोली – महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भन्ते विनयाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मध्वज यात्रा सुरू आहे. त्यानुसार हिंगोली येथे शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जनसंवाद व पंचशील धम्मध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरू आहे. हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी अनागरिक धम्मपाल यांनी सुरू केलेला लढा पुढे भन्ते सुरई ससाई नागार्जुन यांनी जिवंत ठेवला. त्यानंतर अनेक वर्षांनी भन्ते आकाश लामा, भन्ते विनयाचार्य, भन्ते के.के. राहुल, भन्ते सुमित रत्न यांच्या नेतृत्वात हा लढा पुन्हा सुरू झाला.
हिंगोली येथील यात्रेसाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दुपारी १२ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. रॅलीची सुरुवात पुतळ्यापासून होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होणार आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही रॅली स्व. शिवाजीराव देशमुख सभागृह येथे विसर्जित केली जाणार आहे.
दुपारी २ ते ४ या वेळेत भिमगीतातील सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्यानंतर भन्ते विनयाचार्य यांचे मार्गदर्शन होईल.
या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी दि. ८ सप्टेंबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस भन्ते पय्यावर्धन, भन्ते बुद्धकिर्ती, भन्ते महाघोष, भन्ते कशपली यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उबाळे, प्रा. डॉ. सुखदेव बलखंडे, रविंद्र वाढे, प्रा. डॉ. किशोर इंगोले, ॲड. सुभाष वाघमारे, प्रा. डॉ. कृष्णा इंगळे, प्रा. टी.एम. पोघे, प्रा. बाबासाहेब इंगोले, विनीत उबाळे, बंडु नरवाडे, प्रा. अमर मोरे, अक्षय इंगोले, बबन भुक्तार, प्रा. प्रशांत चाटसे, भिमराव सकपाळ, अनिल पुंडगे, धुळे, सुधा सकपाळ, धाबेबाई आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


Post a Comment
0 Comments