वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
ठाणे म्हारल - दिनांक ०८/०९/२०२५ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ओळखतात अशा म्हारळ या ठिकाणी माणुसकीचे दर्शन दिसून आले. म्हारळ गावातील सर्वांशी प्रेमाने वागणारा सर्वांच्या सुखा दुःखामध्ये नेहमी अग्रेसर असणारा, आपल्या हसऱ्या चेहऱ्याने सर्वांना मनं जिंकणारा, कधीही कोणाला वाईट न बोलणारा, आपला मित्र निलेश लातये याचा मृत्यू झाला आणि सगळीकडे हळहळ पसरली पूर्ण गाव दुःखी झालं त्याचं कारणही तसंच होतं. एक हसमुख सर्वांशी प्रेमाने बोलणारा सर्वांना हसवणारा निलेश ला एका आजाराने ग्रासले होते.घरच्यांनी त्याच्या उपचारात कोणतीही कसर सोडली नव्हती आयुष्याची जमा पूंजी त्याच्या उपचारासाठी लावली पण डगमगले नाहीत.उपचार सुरूच ठेवले फक्त एका आशेवर आपला निलेश सुखरूप बरा होईल. पण जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या संतांच्या अभंगाप्रमाणेच निलेश चे मृत्यूची झुंज संपली आणि निलेश आपल्याला सोडून गेला गेला. निलेश गेल्यानंतरही यातना संपत नाहीत निलेशची बॉडी आई वडिलांना देण्या अगोदर हॉस्पिटल बिल हातात दिले. घरची परिस्थिती खूप खालावली होती बिल भरल्याशिवाय निलेश चा मृतदेह ताब्यात मिळत नव्हता घरच्यांनी कसेबसे पुन्हा ४ लाख जमा केले तरीही २ लाख कमी पडत होते तेव्हा त्याचे जीवलग मित्र म्हणजेच स्वराज्य मित्र मंडळ पुढे आलं आणि समस्त म्हारळकरांना मदतीचं आव्हान करत काही तासातच आवश्यक ती रक्कम जमा करून हॉस्पिटलचं बिल भरून निलेश चा मृतदेह घरी घेऊन आले .... म्हारळगावं हे माणुसकीच दर्शन घडवणारं एक सुजाण गाव आहे हे कालच्या घटनेने सिद्ध झाले.
माणुसकी अजूनही शिल्लक आहे हे पाहून खूप बर वाटलं पण निलेश गेल्याचं दुःख हे आयुष्यभर राहील मी सर्व म्हारळकरांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी अगदी वेळेवर निःसंकोच पणे मदत केली. अशीच मदत यापुढेही गरजूंना होतं राहील ह्यात तिळमात्र शंका नाही.पुन्हा एकदा सर्व म्हारळकरांचे मनापासून आभार आपल्या निलेश ला भावपूर्ण श्रद्धांजली..


Post a Comment
0 Comments