वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके
हिंगोली जिल्ह्यातील मौजे समगा येथे बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने वर्षावास महापर्व आणि मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या सांगता सोहळ्याचे आयोजन 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात करण्यात आले.
वर्षावासाच्या सुरुवातीस मिलिंद प्रश्न हा ग्रंथ लावण्यात आला होता. दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी वर्षावासाची सांगता आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 9 वाजता परित्राणपाठ व पंचशील ग्रहणानंतर ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पूज्य भिक्खुनी शासन ज्योती थेरी (माताजी) यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध मूर्ती घेऊन गावातून धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत विशेष आकर्षण ठरले ते वाशिम जिल्ह्यातील भिमकन्या लेझीम पथकाचे, ज्यांनी आपल्या तालबद्ध सादरीकरणाने संपूर्ण वातावरण धम्ममय केले.
रॅलीनंतर झालेल्या सभेत मौजे बेरूळा येथील बौद्ध उपासक-उपासिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी निळ्या झेंड्याचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ बेरूळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली असा लॉंग मार्च काढून सामाजिक न्यायासाठी लढ्याचे प्रेरणादायी उदाहरण उभे केले होते.
दुपारी 12 ते 4 या वेळेत पूज्य भदंत शासनक्रांती महास्थविर (मुंबई), पूज्य भदंत आनंद (मुंबई), पूज्य भदंत कमलधम्मो (पुसद) आणि पूज्य भदंत पीओनाशक (नालासोपारा) यांच्या प्रेरणादायी धम्मदेशना घेण्यात आल्या. त्रिशरण पंचशील व गाथा मुखोद्गत करणाऱ्या मुलींना शासन ज्योती थेरी माताजी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सागरबाई सिद्धार्थ इंगळे (सरपंच, मौजे समगा) उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून चेतन भाऊ नागरे (युवा नेते, शिवसेना शिंदे गट), सुनील दिपके (औषध निर्माण अधिकारी, नांदेड), धम्मदीप कुऱ्हे (जिल्हा उपाध्यक्ष, NDMJ) आणि करण कुऱ्हे (तालुकाध्यक्ष, NDMJ) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सांगता सर्वांसाठी भोजनदानाने करण्यात आली. रात्री पूर येथील सिद्धार्थ गायन पार्टीच्या भीम-बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाने वर्षावास महापर्व आणि मिलिंद प्रश्न ग्रंथ सांगता सोहळ्याचा भव्य समारोप झाला.



Post a Comment
0 Comments