वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर ता प्रतिनिधी:-शंकर गायकवाड
किन्हवली – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या किन्हवली नगरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहार येथे ६९वा अशोका विजयादशमी सोहळा म्हणजेच धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात नवतरुणांनी पुढाकार घेतल्याने सोहळ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ बौद्धाचार्य जे. जी. उबाळे सर यांच्या सूत्र पठणाने झाली. त्यानंतर “धम्मचक्र प्रवर्तन, अशोका विजयादशमी आणि आमच्या जीवनावर बहुजन नायकांचा प्रभाव” या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान बौद्धाचार्य मनोज रामचंद्र गायकवाड (संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका) यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचीही माहिती दिली.
भारतीय बौद्ध महासभा किन्हवली शाखा महिला अध्यक्ष आयु. ज्योत्स्ना ताई प्रविण फुलपगार यांनी महिलांना व नवतरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच किन्हवली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खैरनार साहेब यांनी बाबासाहेबांच्या धर्मांतर चळवळीचे व सत्याग्रहाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
कार्यक्रमाला आयु. इंदुमतीताई सुरेश फुलपगार, भालेराव ताई, समस्त उबाळे परिवार, मनोज अशोक गायकवाड, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन उबाळे, योगेश उबाळे, विवेक पंडित, किशोर चव्हाण, तुषार दळवी, भरत उबाळे, सुदेश उबाळे, प्रवीण उबाळे, बंडू नाना उबाळे, प्रेम तपासे यांसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
सोहळ्याच्या शेवटी धम्माच्या वाटेवर चालण्याचे अभिवचन उपस्थितांकडून घेण्यात आले. त्यानंतर खीरदानाचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Post a Comment
0 Comments