वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
*प्रतिनिधी:-शंकर गायकवाड*
दिवाळीचा प्रकाशाचा सण साजरा होत असताना मुरबाड तालुक्यातील काही परिसरात गेले 3 दिवस लाईट नसल्याने नागरिक मात्र गेल्या तीन दिवसांपासून अंधारात दिवस काढत आहेत. दिवाळीसारख्या प्रकाशमय सणात सतत वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
स्थानिकांनी सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही वीज विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. अनेक घरांमध्ये दिवाळीच्या सजावटी, फटाके, आणि कार्यक्रम हे सगळे वीज नसल्याने बंद पडले आहेत.
दरम्यान, नागरिकांचा रोष आता स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही वळला आहे.
*“आम्हाला तिकीट द्या, आम्हाला मत द्या, आम्हाला निवडून द्या, पण जेव्हा नागरिक अंधारात आहेत, तेव्हा मात्र कुणीच चौकशीला येत नाही!”* असा सवाल संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
*“पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार तरी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतील का?”* असा सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे.
वीजपुरवठा केव्हा सुरू होणार आणि दिवाळीत नागरिकांना प्रकाशाचा आनंद कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments