वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
किन्हवली – सोगाव रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात कानडी शाळेचे शिक्षक श्री. भेके सर यांच्या इरीटिगा गाडीचे मोठे नुकसान झाले. अरुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंना वाढलेल्या गवतामुळे कट लाईन न दिसल्याने हा अपघात घडल्याचे समजते.
सकाळी अंदाजे ९.४५ वाजताच्या सुमारास सोगावकडून येणारी बस आणि किन्हवलीकडून कानडी शाळेकडे जाणारी भेके सर यांची इरीटिगा गाडी या दोन्ही वाहनांची महात्रे फार्म हाऊसजवळ घासाघीस झाली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
सकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे जवळपास १५ मिनिटे वाहतुकीची कोंडी झाली आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या गवतामुळे कट लाईन दिसत नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचे सांगितले.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, शहापूर यांनी तातडीने पत्रव्यवहार करून रस्त्यावर आलेली झाडे व गवत त्वरित साफ करून घ्यावीत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments