प्रतिनिधी:- अनंता भोईर
*शहापूर (ठाणे)* : काल दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी रिपब्लिकन सेना सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र ऍड. अमन दादा आंबेडकर यांनी शहापूर तालुक्याला भेट देऊन येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यापक चर्चा केली.
या भेटीवेळी तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या पुढाकाराने अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
*पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते :*
विकास राजेंद्र अभंगनि,तीन गोपाळ उबाळेम,नोज लक्ष्मण जाधव, मयूर जाधव,श्रीकांत भगवान गायकवाड
मिथुन दीपक जाधव,प्रशांत सुरेश गायकवाड,नितीन सुदान उबाळे,निलेश मंगल साळवे,पंकज पद्माकर उबाळे
तसेच आणखी अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेवर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला.
यावेळी ऍड. अमन दादा आंबेडकर यांनी शहापूर तालुक्यातील राजकीय परिस्थिती, मतदारांची अपेक्षा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना भक्कमपणे कशी उभी राहील, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास युवा शहापूर तालुका अध्यक्ष दिपकेश उबाळे, पूर्ण युवा कमिटी, तसेच अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शाहिद शेख आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते हजेरी लावली.


Post a Comment
0 Comments