वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
आनंद भालेराव
कल्याण : ऑल इंडिया रेल्वेमेन्स पेंशनर्स वेलफेअर फेडरेशन मुंबई डिव्हिजनची महत्त्वपूर्ण बैठक आज दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याण मेन ब्रॅंच येथे उत्साहात पार पडली. मुंबई विभागीय अध्यक्ष कॉ. जे. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि हेडक्वार्टरचे कार्याध्यक्ष कॉ. रसिक मलबारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी कल्याण, इगतपुरी, कसारा, वासिंद, कर्जत येथील अध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत गेल्या दोन महिन्यांतील कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः मेंबरशीप वाढ, तसेच येत्या 15 डिसेंबर 2025 रोजी प्रशासनाद्वारे आयोजित पेंशन अदालतसाठी प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत विविध ब्रँचमधील पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल सुविधा, पेंशन संदर्भातील मुद्दे, ब्रॅंच कार्यालये तसेच संघटनात्मक विषयांवर आपले विचार मांडले. डिव्हिजन वर्किंग सेक्रेटरी कॉ. कासार, कार्याध्यक्ष कॉ. अरूण मनोरे, हेडक्वार्टर कार्यकारी अध्यक्ष कॉ. रसिक मलबारी आणि अध्यक्ष कॉ. जे. एन. पाटील यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
डिव्हिजन सेक्रेटरी कॉ. आनंद भालेराव यांनी गेल्या चार महिन्यांतील कार्याचा अहवाल सादर केला तसेच सुत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. शेवटी सर्व पदाधिकारी आणि ब्रॅंच प्रतिनिधींना आभार मानून बैठक संपन्न झाली. बैठकानंतर सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.


Post a Comment
0 Comments