वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
मोहन दिपके
हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील पंजाबराव मोरे खून प्रकरणाचा तपास योग्य आणि निपक्ष होण्यासाठी सदरचे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा आणि या प्रकरणात कलम वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी आज आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांना निवेदन देण्यात आले.मोरे कुटुंबाची भेट घेण्यात आली.
आज आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात वसमत विभागाचे उपविभागी पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले , सहायक पोलिस निरीक्षक सिवसांब घेवारे,यांना प्रत्यक्ष भेटून कुटुंबानी सांगीतली संपूर्ण माहिती लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी सदर प्रकरण तात्काळ सीआयडी कडे वर्ग करावा तसेच खुनाचा गुन्हा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा सह सदर गुन्हा पुर्व नियोजित -संगनमत करुन घडवुन आनल्याने कट रचने व पुरावा नस्ट करणे हे कलम समाविष्ट करुन इतर सह आरोपी करुन प्रकरणाचा तपास जलद गतीने करून दोषारोप तात्काळ दाखल करावे, आणि प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालू आहे अशी मागणी केली. निवेदनावर युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, महाराष्ट्र लिगल सेल नेते ॲड. रावन धाबे, विठ्ठलदादा पंडीत, माणिकदादा पंडित, शंकरदादा बगाटे, विनोददादा थोरात, भिमराव इंगोले, प्रा.बाळासाहेब पाईकराव, सुभाष खाडे, कामाजी खिल्लारे, शाम खाडे आदिच्या सह्या आहेत.



Post a Comment
0 Comments