Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुरबाडमध्ये धक्कादायक घटना : मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

शंकर गायकवाड

मुरबाड तालुक्यातील मोरोशी आदिवासी आश्रम शाळेत एक अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना घडली आहे. या शाळेत निवासी स्वरूपात शिक्षण घेत असलेली दहावीतील १५ वर्षीय विद्यार्थिनी कु. कोमल भास्कर खाकर हिने रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सदर घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शाळा प्रशासन, विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून टोकावडे पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

ही आदिवासी आश्रम शाळा शहापूर आदिवासी प्रकल्पांतर्गत येत असून, येथे निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांच्या पालकांनी या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून घटनेची गंभीर दखल घेतली जावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आश्रम शाळांमधील देखरेख, समुपदेशन व सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments