वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन समारंभप्रसंगी मार्गदर्शन करताना शारदा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. प्रा. प्रदीप ढवळ सर यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षाला लिखिते मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. संपदा कुलकर्णी मॅडम तसेच उपप्राचार्य दीपिका तलाठी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरासाठी यंदाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सावरोली (सो.) ही शाळा निवडण्यात आली आहे. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गंगाधर ढमके गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करून अशा उपक्रमांमुळे शाळा व गावाच्या विकासाला चालना मिळते, असे सांगितले. तसेच ग्रुप ग्रामपंचायत सावरोली (सो.) तंटामुक्ती अध्यक्ष तथा वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड यांनीही आपले विचार मांडून महाविद्यालयाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश केदार, समितीच्या सदस्या शेख ताई, गावातील ग्रामस्थ हरी दवणे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण विकास शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत असून गावाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.



Post a Comment
0 Comments