वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज.
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
मुंबई – देशातील सर्वात मोठी विमान सेवा असलेल्या IndiGo कंपनीला गेल्या नऊ दिवसांपासून उड्डाण व्यवस्थापनातील गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर उड्डाणे रद्द होणे, मोठ्या प्रमाणावर उशीर होणे आणि प्रवाशांची गैरसोय वाढतच आहे.
९ दिवसांत ९०० हून अधिक उड्डाणे रद्द
१ ते ९ डिसेंबरदरम्यान देशभरात IndiGo ची तब्बल ९०५ उड्डाणे रद्द झाली असून १,४७५ पेक्षा जास्त उड्डाणांना मोठा विलंब झाला आहे. फक्त मुंबई विमानतळावरच ४०,००० पेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास रद्द करावा लागला तर २.६ लाखांहून
अधिक प्रवासी विलंबामुळे प्रभावित झाले.
संकटाची प्रमुख कारणे कोणती?
पायलट व क्रूची मोठी कमतरता – DGCA चे नवे ‘Rest & Duty’ नियम लागू झाल्यानंतर इंडिगोला अपेक्षित प्रमाणात क्रू उपलब्ध झाला नाही.
रॉस्टर व्यवस्थापनातील त्रुटी – अनेक उड्डाणांसाठी अचानक पायलट उपलब्ध नसणे, चुकीचे शेड्युलिंग.
तांत्रिक अडचणी व अंतर्गत व्यवस्थापनातील त्रुटी – काही विमानांच्या तांत्रिक तपासणीत उशीर.
प्रवाशांचे हाल – तासन् तास प्रतीक्षा
विमान रद्द होणे किंवा ३ ते ८ तास विलंबामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
कनेक्टिंग फ्लाइट्स चुकल्या,सामान मिळण्यात उशीर,वृद्ध व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना त्रास
पर्यायी तिकिटांचे दर वाढले
DGCA ची कठोर चौकशी
उड्डाण व्यवस्थेतील या व्यापक बिघाडानंतर नागरी उड्डयन महानिर्देशालय DGCA ने IndiGo ला show-cause notice दिला आहे.
कंपनीकडून तातडीने स्पष्टिकरण मागवले आहे,मुंबईसह १० विमानतळांवर अचानक तपासणी सुरू ग्राहकांना योग्य भरपाई मिळाल्याची खात्री करण्याचे आदेश .
IndiGo चे स्पष्टीकरण
कंपनीने सांगितले की,हे संकट अनेक कारणांच्या एकत्रित परिणामामुळे निर्माण झाले आहे.”
उड्डाणांचे नवीन वेळापत्रक तयार केले जात असल्याचे आश्वासन
रद्द/उशिराच्या उड्डाणांसाठी प्रवाशांना पर्याय व परतावा दिला जाईल,पुढील काही दिवस प्रवास करणाऱ्यांसाठी सूचना
फ्लाइट स्टेटस सतत तपासा
पर्यायी उड्डाणाचा पर्याय ठेवा
अत्यावश्यक प्रवास असल्यास लवचिक वेळ निवडा.



Post a Comment
0 Comments