Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

महसूल विभागाच्या कथित चालढकलीविरोधात आमरण उपोषण

प्रतिनिधी -शंकर गायकवाड 

शहापूर (जि. ठाणे) : महसूल विभागाच्या कथित चालढकलीविरोधात सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मौजे वरस्कोळ, ता. शहापूर, जि. ठाणे येथील सर्व्हे नं. ४/१ व ७२/५ या जागेबाबतच्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.


उपोषणकर्ते कु. धिरज मुन्नाप्रसाद तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जागेचे पहिले खरेदीदार आम्हीच असून त्यासाठी शहापूर तहसीलदार कार्यालयाकडे रुपये १६,४४,५१२/- इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यानुसार फेरफार क्रमांक १०६० नुसार शेतकरी के. मुन्नाप्रसाद शामसुंदर तिवारी यांच्या वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.


तसेच खर्डी MIDC परिसरात झालेल्या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्री प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.


या सर्व मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालय, शहापूर येथे आमरण उपोषण सुरू असून परिसरात आंदोलनामुळे चर्चा रंगली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments