प्रतिनिधी : आनंद भालेराव
कसारा : ऑल इंडिया रेल्वे पेन्शनर वेल्फेयर फेडरेशनच्या कसारा शाखेची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी बारा वाजता कसारा रेल्वे स्थानक येथे पार पडली. या बैठकीस अध्यक्ष काॅ. प्रल्हाद खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बैठकीदरम्यान कसारा विभागातील सेवानिवृत्त कामगारांच्या विविध तक्रारी व समस्या यांचा आढावा घेण्यात आला. श्रीमती रंजनाबाई कतवारे, श्रीमती सुमनबाई तसेच श्रीमती विमलबाई म्हसणे यांनी आपल्या समस्या मांडल्या. या सर्व समस्यांच्या निवारणासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली.
मुंबई मंडळाचे सचिव काॅ. आनंदा भालेराव यांनी उपस्थित सेवानिवृत्त कामगारांच्या अडचणी समजून घेत सविस्तर माहिती घेतली. तसेच कसारा शाखेच्या वतीने काॅ. दिलीप वेंखडे (सचिव), काॅ. दिलीप शिंदे (आर्गनायझिंग सचिव), काॅ. अशोक सोनावणे (खजिनदार), काॅ. गुलाब शिंदे (उपाध्यक्ष) आणि काॅ. भगवान पंडित (सदस्य) उपस्थित होते.
दरम्यान, माजी उपाध्यक्ष स्वर्गीय कमलाकर पराड यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदावर काॅ. अशोक इसावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मुंबई मंडळातील पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कसारा शाखेला सतत लाभत असल्याचे शाखा सचिवांनी यावेळी नमूद केले. अध्यक्षांच्या परवानगीने बैठक समाप्त करण्यात आली.
काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे – कोकण रेल्वे) यांनीही संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments