परप्रांतीय तरुणाने हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.
![]() |
| प्रतिकारात्मक फोटो |
कल्याण:-डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत',तुम्ही जरा थांबा. असे इतकेच रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणी म्हणाली होती. त्यामुळे संतापलेल्या परप्रांतीय तरुणाने रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पूर्वेतील बालचिकित्सालय रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव गोकूळ झा असे आहे.त्याच्याविरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गोकुळचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात बाल चिकीत्सालय रुग्णालय आहे.या रुग्णालयात एक तरुणी रिसेप्शनिस्टचे काम करते. तीन दोन शिफ्टमध्ये काम करते.संध्याकाळच्या शिफ्टमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी रुग्णालयात कामावर कार्यरत होती. त्याचवेळी एक महिला तिच्या बाळाला घेऊन डॉक्टरांकडे आली होती. त्यावेळी डॉक्टर आले नव्हते. डॉक्टर येण्याची वाट चार ते पाच पेशंट बघत होते. त्याचवेळी डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले होते. तरुणी काम करीत असताना बाळाच्या उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत गोकुळ झा हा तरुण देखील होता.
तो अचानकपणे डॉक्टरांच्या केबीनमध्ये घुसू लागला. तेव्हा तरुणी त्याला म्हणाली, 'डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले आहेत जरा थांबा.' तरुणीचं हे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या गोकुळने तरुणीला शिवीगाळ सुरु केली. त्याने तरुणीचा हात धरुन बाहेर ओढले.तिला लाथा बुक्क्याने मारहाण केली.ही सगळी घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या प्रकरणी तरुणीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांनी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकूळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलीस गोकूळचा शोध घेत आहे. मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून मारहाण झाल्याने कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली आहे.


Post a Comment
0 Comments