Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कल्याणमध्ये मराठी तरुणीला अमानुष मारहाण करणाऱ्या गुंडाला अखेर अटक

कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला आता अटक झाली आहे.

अविनाश जाधव व पिढीत मुलगी 

कल्याणमधील रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला परप्रांतीयाने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे. गोकुळ झा या गुंडाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. तिला जमिनीवर फरफटत नेले होते. यामुळे तरुणीच्या मानेला आणि छातीला इजा झाली होती. पोलिसांनी आता गोकुळ झा या आरोपीला नांदिवली भागातून अटक केली आहे. या व्यक्तीची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून याआधी त्याच्यावर 3 गुन्हे दाखल झालेले आहेत, अस पोलिसांनी म्हटलं आहे. कल्याणमधील तरुणीला मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा दोघांनाही अटक झाली आहे.

मानपाडा पोलीस आज त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत. 11 ते 12 च्या सुमारास कल्याण न्यायालयात त्यांना हजर करण्यात येईल. मुख्य आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस त्याच्या जास्तीत जास्त चौकशीसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहेत. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या इतर आरोपीच्या नातेवाईकाची चौकशी करून त्यांना देखील अटक करण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात मनसे सक्रीय झाल्यानंतर तपासाला वेग आला. आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेऊ, असं आश्वासन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीला दिलं होतं. मनसेचे अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीवर पक्षातर्फे उपचार केले जातील, असे सांगितले. तसेच या तरुणीला तुझ्या आणखी काय अपेक्षा आहेत. अशी विचारणा केली. तरुणीने असा प्रकार अन्य कोणासोबतही घडू नये, अशी आशा व्यक्त केली आहे.

अविनाश जाधव म्हणालेले की, “ज्या पद्धतीने तिला अमानुष मारहाण केली, त्यात आरोपी हार्डकोर क्रिमिनल दिसत आहे. युपी बिहारमध्ये जे क्रिमिनल असतात ते तिकडून या ठिकाणी येतात आणि धंदे करतात. पोलिसांना विनंती आहे, याला लवकरात लवकर अटक करावी. नाहीतर तो आमच्या हाताला लागला तर आम्ही देखील त्यांने त्या मुलीवर हात उचलला तसा हाताचा वापर करू”

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलेलं?

पीडित तरुणीवर उपचार करणारे जानकी हॅास्पिटलचे डॉक्टर मोईन शेख यांनी सांगितलं की, “तिच्या मानेवर मारहाण करण्यात आली आहे. तिला मान हलवताना खुप वेदना होत आहे तसेच तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. मात्र मारहाणीमुळे तिला पॅरेलॅसिस होवू शकतो.



Post a Comment

0 Comments