आकाश दादा शिरसाट यांचे आवाहन : "भाकर खाणाऱ्यांनी भाकर देणाऱ्याला न्याय मिळवून द्यायलाच हवा"
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
बाळापूर (ता. २३ जुलै २०२५)प्रतिनिधी:- हसन शेख
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी सम्राट अशोक सेनातर्फे बाळापूर हायवे रोड येथे २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आकाश दादा शिरसाट करणार असून, त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की जातीसाठी किंवा धर्मासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आपण एकत्र आले पाहिजे.
"आपण जे लढाई लढायला निघालो आहोत ती सत्याची आहे, इमानदारीची आहे. शेतकरी बापाच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचे दाम त्याला मिळालेच पाहिजेत. भाकर खाणाऱ्यांनी भाकर देणाऱ्याला न्याय मिळवून दिलाच पाहिजे," असे शिरसाट यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, थकीत कर्ज माफ करणे आणि शेतीमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी हे आंदोलन होणार असून, "बळीराजा तू घेऊ नको फाशी – जग राहील तुझ्या बिना उपाशी" अशा घोषणा देत रास्ता रोको करण्यात येणार आहे.
सम्राट अशोक सेनेच्या वतीने सर्व शेतकरी बांधव, तरुण वर्ग, महिलावर्ग व सामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की या लढ्यात सामील व्हावे आणि बळीराजाच्या हक्कासाठी उभे राहावे.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे
सहसंपादक : संदेशजी भालेराव
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी ह्या 8830708522 नंबर वर कॉल करा.


Post a Comment
0 Comments