Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

📰 वासिंद गैरसे पूलाला अखेर न्याय; युग प्रतिष्ठानच्या सात वर्षांच्या पाठपुराव्याला यश

२०१८ साली खचलेला वासिंद-गैरसे पूल.


वृत्तरत्न  नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

शहापूर/कल्याण :- गणेश आहिरे 

शहापूर आणि कल्याण तालुक्याला जोडणारा वासिंद - गैरसे परिसरातील महत्त्वाचा पूल २०१८ साली धोकादायक स्थितीत गेला होता. त्या वेळेस पुलाचे कॉन्क्रीट पूर्णपणे निघून गेल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.


यावेळी युग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी जे. ईश्वर यांना घटनास्थळी बोलावून वस्तुस्थिती दाखवली. तात्काळ तीन दिवस वाहतूक बंद ठेवून प्रकाश दिवाणे आणि विनायक राव यांच्या सहकार्याने प्राथमिक स्वरूपात पूल दुरुस्त करण्यात आला.


त्यानंतर झी टीव्हीचे पत्रकार अमित गडगे यांच्या माध्यमातून युग प्रतिष्ठानने या मुद्द्यावर सतत आवाज उठवला. सात वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर पुलाच्या नव्या कामाला मंजुरी मिळाली आहे.


जॉली कन्स्ट्रक्शन कंपनी — जी भातसा धरण प्रकल्पावर देखील कार्यरत आहे — तीच ही कामे हाती घेणार असल्याची माहिती युग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी दिली.


या लढ्यात गैरसे गावातील सामाजिक कार्यकर्ते अजित दिवाणे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.


युग प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य:

अनिल दाबोळकर, शैलेश अंबावणे, संतोष जगताप, राहुल दोंदे, सचिन घेगडे, अशोक गावडे, स्वप्नील पंडित.



Post a Comment

0 Comments