वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
बालाजी गायकवाड -कंधार
कंधार तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांना पंचायत समिती कार्यालयात कामकाजासाठी स्वतंत्र भवन उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती कंधार यांच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात मागणी करण्यात आली की, ग्राम रोजगार सहाय्यकांना स्वतंत्र भवन उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच गेल्या १७ वर्षांपासून विमा संरक्षण न मिळाल्याने त्यांच्या नावे विमा भरून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षेची हमी द्यावी.
पंचायत समिती कार्यालयातील काही ऑपरेटर, एपीओ आणि कर्मचाऱ्यांकडून दलालामार्फत कामे करून घेतली जात असून, या दलाली प्रक्रियेवर तात्काळ बंदी आणण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्राम रोजगार सहाय्यकांना त्यांच्या कामासाठी आवश्यक असणारे आयडी आणि पासवर्ड तातडीने उपलब्ध करून द्यावेत.
कामाचे नमुने (नमुना १ ते ७) वेळेवर मिळत नसल्याने कामात अडथळे येत असून, काही कर्मचाऱ्यांकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्राम रोजगार सहाय्यक लाभार्थ्यांची कामे वेळेवर करतात, मात्र त्यांना मानधन, कमिशन व प्रवास भत्त्याचा नियमितपणे लाभ मिळत नाही.
ही सर्व मागणी गटविकास अधिकारी व नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवळे यांनी गांभीर्याने घेऊन तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे कंधार तालुका अध्यक्ष मोतीराम पाटील तोरणे, सचिव मोहन पाटील जाधव, यासार गायकवाड, रावसाहेब सूर्यवंशी, संजीव ऐतवाड आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर .
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर .
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522 .


Post a Comment
0 Comments