संरक्षण भिंतीअभावी घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे तत्काळ उपाययोजनांची मागणी केली असून, याबाबत सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
खिंडीपाडा, भांडुप येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीची पाहणी; प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी
खिंडीपाडा, भांडुप (मुंबई) येथे संरक्षण भिंत नसल्यामुळे झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश कार्यकारिणीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या संकटाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे तत्काळ आणि ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, पावसाळ्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबतही सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन माहिती घेण्यात आली.
नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला हा धोकादायक खेळ थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज असून, यावर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत आम्ही लढत राहू, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, महासचिव विश्वास सरदार, तसेच सतीश राजगुरू उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments