
वैभवजी गिते
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गट विकास अधिकारी सचिव यांच्या माध्यमातून दहिवडी कॉलेज दहिवडी येथे ॲट्रॉसिटी ॲक्ट कार्यशाळा होणार आहे, या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन ॲट्रॉसिटी चे तज्ञ तसेच नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेचे राज्य सचिव केंद्रीय नामनिर्देशित सदस्य उपविभागीय दक्षता समिती दहिवडी माण खटाव वैभव तानाजी गीते , विशेष सरकारी वकील ॲड अमोल सोनवणे , विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत हे ॲट्रॉसिटी कायद्यावर मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील वाढणारे अन्याय अत्याचार दूर होण्यासाठी ही कार्यशाळा म्हत्वाची ठरणार आहे .
या मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी , सर्व पोलिस निरीक्षक , ग्रामसेवक , सर्व तलाठी , पोलिस पाटील सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे तरी नागरिकांनी सुद्धा दहिवडी कॉलेज दहिवडी या ठिकाणी उपस्थित रहावे असे सांगितले आहे.

Post a Comment
0 Comments