Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

दारूचा काळाबाजार उघड – लॅपटॉप दुकानाच्या आड सुरू होती अवैध विक्री.

 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

उल्हासनगर.

उल्हासनगर शहरात लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाच्या आडून सुरू असलेल्या विदेशी दारूच्या अवैध धंद्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 3.5 लाख रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दुकानाचा मालक कमलेश जयरानी याला अटक करण्यात आली असून, अन्य संशयित आरोपी फरार आहेत.

या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी कमलेश जयरानी या दुकानमालकाला अटक केली आहे.


गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही धडक कारवाई केली. उल्हासनगरमधील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक दुकानात ही दारू लपवून ठेवली जात होती. कॅनडा, इंग्लंड आणि दुबई येथून ही विदेशी दारू आणली जात होती आणि शहरातील लग्न समारंभ व खासगी पार्ट्यांमध्ये तिचा पुरवठा केला जात होता.


विशेष म्हणजे या व्यवसायामागे असलेल्या टोळीने उत्पादन शुल्क चुकवत ही दारू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत होती. परिणामी, राज्याच्या महसुलाला मोठा फटका बसत होता.


सध्या पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरू असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments