वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज{संपादकीय}✍🏻
नागपूर:-
बौद्ध समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या पवित्र दीक्षाभूमी परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ची गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे, या बैठकीनंतर काही स्वयंसेवक बाहेर पडताना नागरिकांच्या नजरेस पडले आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामुळे समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दीक्षाभूमीसारख्या ऐतिहासिक आणि बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळी अशा प्रकारची गुप्त बैठक नेमकी कशासाठी आयोजित करण्यात आली? ही सर्वसामान्यांची रास्त शंका आहे. या परिसरात आरएसएसची बैठक होणे हे केवळ धक्कादायकच नाही, तर बौद्ध समाजाच्या अस्मितेवर घाला असल्याचा आरोपही अनेकांकडून होतो आहे.
तसेच, या बैठकीला परवानगी कोणी दिली? दीक्षाभूमी कमिटी झोपली आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे. एवढ्या संवेदनशील स्थळी, ज्याठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तिथे आरएसएससारख्या संघटनेची गुप्त बैठक होणे हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे.
मीडिया यावर गप्प का? अनेक मोठ्या मीडिया संस्थांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. ही पत्रकारितेची निष्क्रियता की जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष? हा देखील मोठा प्रश्न बनला आहे.
या घटनेमागे कोणाचा हात आहे? कोणाच्या संमतीने ही बैठक झाली? याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. नागपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, बौद्ध अनुयायी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारेतील संघटना आता या विरोधात आवाज उठवण्यास सज्ज झाल्या आहेत.
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्युज✍🏻
मुख्य संपादक : सागर रोकडे .
सहसंपादक : संदेश भालेराव .
कार्यकारी संपादक : रितेश साबळे .
प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी ह्या 8830708522 नंबर वर कॉल करा.




Post a Comment
0 Comments