Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

दलित महिलांच्या सशक्तीकरणाची प्रतीक — फूलन देवी यांचा थरारक इतिहास.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

रितेश नामदेव साबळे {कार्यकारी संपादक}

 दि. २६ जुलै २०२५

भारतातील सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्षाची जिवंत कहाणी म्हणजे फूलन देवी. एक गरीब, दलित कुटुंबात १० ऑगस्ट १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील पूरवा गावात जन्मलेल्या फूलन देवींचे बालपण अत्यंत हालअपेष्टांनी भरलेले होते. अल्पवयातच त्यांचं लग्न एका वयस्क पुरुषाशी लावण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात अत्याचार, अन्याय आणि संघर्षाचा काळ सुरू झाला.


अत्याचारातून बंडाच्या प्रवासाकडे


फूलन देवी यांना त्यांच्या जात आणि लिंगाच्या आधारावर अनेक अपमान सहन करावे लागले. त्यानंतर त्यांनी बंदुक हाती घेतली आणि त्यांनी बंडखोर मार्ग स्वीकारत अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी एका डकैत गटात सामील होऊन अन्याय्य जमीनदार व सवर्ण अत्याचार करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.


 बहमई हत्याकांड - एक निर्णायक क्षण


१९८१ साली बहमई गावात झालेल्या हत्याकांडात, त्यांनी २० सवर्ण पुरुषांचा गोळ्यांनी खात्मा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. हा हत्याकांड संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरला. काहींसाठी त्या बदला घेणारी वीरांगना ठरल्या, तर काहींसाठी अपराधी.


आत्मसमर्पण आणि राजकारणात प्रवेश 


१९८३ मध्ये फूलन देवी यांनी आत्मसमर्पण केलं आणि तुरुंगात गेल्या. तब्बल ११ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर, १९९४ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांची सुटका केली. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मिर्झापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडणूक जिंकली.

त्यांनी संसदेत दलित, गरीब, महिला अत्याचारग्रस्तांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला.


 जीवनाचा दुर्दैवी अंत


२५ जुलै २००१ रोजी, दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांचा मृत्यू केवळ त्यांच्या समर्थकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक धक्का होता.


 आजही ते नाव प्रेरणादायी


फूलन देवी यांचं जीवन म्हणजे एक बंडखोर प्रवास, जो अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत ठरतो. त्यांनी दाखवलेला आत्मसन्मान, लढाऊ वृत्ती आणि बदल घडवण्याची जिद्द आजही अनेक दलित महिलांना सशक्ततेकडे नेते.



 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्युज 

 मुख्य संपादक : सागरजी रोकडे

 सहसंपादक : संदेशजी भालेराव

कार्यकारी संपादक : रितेशजी साबळे

प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी ह्या 8830708522 नंबर वर कॉल करा.

Post a Comment

0 Comments