Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

२६ जुलै – सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची ऐतिहासिक सुरुवात !

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

रितेश साबळे:-कार्यकारी संपादक


आजचा दिवस भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरतो. २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानाचे महान सम्राट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.



शाहू महाराजांनी ‘कोल्हापूर राज्य राजपत्र’ (Kolhapur State Gazette) मध्ये जाहिरनामा प्रसिद्ध करत सरकारी नोकऱ्यांध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केल्याची घोषणा केली होती. ही घटना भारतातील पहिलीच आरक्षणाची अधिकृत नोंद आहे.


या निर्णयाने सामाजिक समता, शैक्षणिक व रोजगार संधींची दारे मागास घटकांसाठी खुली झाली. भारतीय संविधान तयार होण्याच्या आधीच राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची पायाभरणी केली होती.


आज या ऐतिहासिक घटनेला १२३ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सामाजिक न्यायाचे जनक म्हणून ओळखले जाणारे शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर .
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर .
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
 जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522 .

Post a Comment

0 Comments