वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
खामगाव (जि. बुलढाणा): हसन शेख
रोहन पैठणकर या युवकावर धर्म विचारून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज खामगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वंचित बहुजन आघाडीने पोलिस प्रशासनाला निवेदन देत कठोर शब्दांत इशारा दिला आहे की, येत्या आठ दिवसांत आरोपींना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास, संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या घटनेबाबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणाले, "रोहन पैठणकर यांच्यावर धर्म विचारून अमानुष पद्धतीने हल्ला केला गेला. हा प्रकार मानवतेला काळीमा फासणारा असून, आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे."
पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे सर
जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522.




Post a Comment
0 Comments