पोलिसही यामुळे हादरून गेले होते. त्यांनी महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे तात्काळ कारवाई करत आरोपी आईला ताब्यात घेतलं.
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर:-ठाणे जिल्ह्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. त्याने सर्वच जण दाहरून गेले आहे. एका 27 वर्षीय महिलेनं आपल्या पोटच्या तीन मुलांना विष देवून ठार केले आहे. कौटुंबिक वादातून तिने हा पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. तिनहही मुलं दहा वर्षाच्या आतील होती. हा घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय आईनं आपल्याच मुलांना का मारलं अशी चर्चा ही सुरू आहे.
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना शहापूर तालुक्याती असनोली गावात घडली आहे. या गावातल्या तालेपाडामध्ये संध्या संदीप भेरे या कुटुंबासहीत राहात होत्या. त्यांनी वरण भातामध्ये कीटकनाशक मिसळले. त्यानंतर तो डाळभात तिने 20 जुलै ला आपल्या पाच, आठ आणि दहा वर्षांच्या मुलींना खाऊ घातले. त्यानंतर त्या तिनही मुलींची तब्येत बिघडली. त्यांना उलट्या व चक्कर येऊ लागल्या. त्यानंतर त्यांना एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिकाऱ्याने सांगितले की, प्रकृती बिघडल्याने त्यापैकी दोघांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दोघींपैकी एकाचा 24 जुलै रोजी तर दुसऱ्या मुलीचा 25 जुलै रोजी मृत्यू झाला. तर तिसऱ्या मुलीला नाशिकमधील एका रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. जिथे 24 जुलै रोजी तिनेही अखेरचा श्वास घेतला. किन्हवली पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी सांगितले की, मात्र शनिवारी रात्री मुलींचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या शरीरात विष असल्याचे आढळून आले.
पोलिसही यामुळे हादरून गेले होते. त्यांनी महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे तात्काळ कारवाई करत मुलींच्या आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. शनिवारी रात्री दोन वाजता तिला अटक केली.आरोपी महिला कौटुंबिक त्रासाने हैराण झाली होती. तिचा पती मोठ्या प्रमाणात दारू पित होता. त्यामुळे ती आणखीन खचली होती. त्यामुळेच संबंधीत महिला पतीपासून वेगळी राहत होती. आपल्या तीन मुलींची काळजी घेण्यासाठी तिला अडचणींचा सामना करावा लागत होता. ज्यामुळे महिलेने अखेर टाकाचे पाऊल उचलत हे कृत्य केले.
पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या सासरच्यांना तिन्ही मुलांच्या मृत्यूमध्ये तिचा सहभाग असल्याचा संशय होता. पोलिसांनी सांगितले की, महिलेला सुरुवातीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरूवातीला पोलिसांना यप्रकरणी संशय आला नाही. पण ज्यावेळी शवविच्छेदन अहवाल समोर आला त्यावेळी ते ही हादरून गेले. अखेर महिलेने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.


Post a Comment
0 Comments