Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

धर्म विचारून गाय चोरीचा आरोप करून मारहाण झालेल्या रोहन पैठणकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात घेतली भेट!

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क; हसन शेख


अकोला :- खामगाव येथील रोहन पैठणकर या युवकाला ‘तुझा धर्म कोणता आहे?’ असा सवाल करत, त्याच्यावर गाय चोरीचा आरोप लावून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.




ही मारहाण इतकी गंभीर होती की रोहन पैठणकर यांना अकोला जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.


या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व अॅड. अन्वर शेरा यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात जाऊन रोहन पैठणकर आणि त्यांच्या आईची भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला आणि त्यांच्या न्यायासाठी लढण्याचा शब्द दिला.


रोहन यांची आई म्हणाल्या की, “ रोहन तब्येत अतिशय नाजूक असताना वंचित बहुजन आघाडीचे रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ हे रुग्णालयात सतत उपस्थित राहून काळजी घेत आहेत. आम्ही यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार मानतो.”


या भेटीदरम्यान वंचितचे अकोला जिल्हा रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, कार्यकर्ते युनूस पांडे, संजय किर्तक, अमोल साळवे, हसन शेख यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर

सहसंपादक : संदेशजी भालेराव सर

कार्यकारी संपादक : रितेश साबळे सर

जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522

Post a Comment

0 Comments