वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
स्त्री अनुभवांच्या अंतरंगात शिरणारी, पारंपरिक चौकटींना हादरवणारी ही कविता वाचकांना अंतर्मुख करेल…
प्रस्थापित गप्पांच्या चौकटीत उधळलेली ही बंडखोर शब्दांची सीडी लवकरच तुमच्या हाती.
![]() |
| कवी - गणेश अहिरे 9503664221 |
अजूनही विटाळ तुम्हांला रक्ताचागोठलेल्या लाल काळ्या रंगाचा
सन्मान करा त्या नारीचा त्याच
रक्ताच्या गाठीत जन्म स्त्री पुरुषाचा
घेतो आनंद तिच्या देहाचा
विचार केलास का त्रासलेल्या मनाचा
बाप नावाची पदवी मिळते जेव्हा
नवा जन्म होतो त्या स्त्री मातेचा
समजून घ्या तिच्या त्रासाला
किती जपते एका गर्भाला
तेव्हा विटाळ वाटत नाही तुम्हांला
रक्तानेच जन्म देते बाळाला
नका समजू विटाळ त्या रक्ताला
वरदान दिले निसर्गाने स्त्रीपणाला
आलीच असती पाळी पुरुषाला
कळले असते त्रास तुझ्या शरीराला
![]() |
| संपादक:-देवभाऊ उबाळे |
|



Post a Comment
0 Comments