कार्यकारी संपादक : रितेश साबळे .
औरंगाबाद
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेव्हा बहुजन, शोषित आणि राजे-रजवाड्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला आणि इंग्रजांची ताकद कमकुवत झाली, त्याच दरम्यान दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे जर्मनी व फ्रान्सशी युद्ध सुरू होते. या दुहेरी संकटामुळे इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला.
भारतात सत्ता हस्तांतरणापूर्वी ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना स्पष्ट सांगितले की, हिंदू, मुस्लिम आणि अस्पृश्य – या तिन्ही समाजघटकांना मान्य होईल अशी संविधानरचना केली नाही, तर सत्ता दिली जाणार नाही. लॉर्ड बर्कनहेडने १९२७ मध्ये भारतीयांना संविधान तयार करण्याचे आवाहन केले.
मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती तयार झाली, परंतु तिचा मसुदा भारतीयांनी नाकारला. नंतर दुसरी समिती १९३० मध्ये गोलमेज परिषदेच्या अनुषंगाने तयार झाली, तीही अपयशी ठरली. तिसरी समिती तेजप्रतापसिंह सप्रु यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली, पण तीही तीनही घटकांना मान्य होऊ शकली नाही.
शेवटी चौथी समिती बी.एन. राव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. यामध्ये नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडितही होत्या. या समितीला परदेशी संविधानांचा अभ्यास करण्यासाठी परदेशात पाठवण्यात आले. त्यांनी जगप्रसिद्ध तज्ज्ञ फिलिप जेनिंग्स यांची भेट घेतली. जेनिंग्स यांनी भारतातच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सुचवले.
ही गोष्ट कळताच समितीने भारतात परत येऊन ही माहिती नेहरू, गांधी व राजेंद्रप्रसाद यांना सांगितली. आधी आंबेडकरांना घटनासभेवरून दूर ठेवण्यासाठी अनेक राजकीय षडयंत्रे रचली गेली होती. बाबासाहेबांना निवडणूक लढवायला तिकीटही देण्यात आले नव्हते. काँग्रेसने पाकिस्तानमध्ये समाविष्ट झालेले चार जिल्हे दिले होते, जिथून ते निवडून आले होते.
बाबासाहेबांनी काँग्रेसच्या घटनावर बहिष्कार टाकल्यामुळे ब्रिटीशांनी सत्ता हस्तांतरण थांबवले. अखेर नाईलाजाने काँग्रेसने बाबासाहेबांना मुंबईतून निवडून आणले आणि घटनासभेवर नियुक्त केले. त्यांनी संविधान तयार करून दिले आणि त्यावर आधारित भारतात सत्ता हस्तांतर झाले.
![]() |
आज बी.एन. राव यांना संविधानाचा शिल्पकार म्हणण्याचा खोटा प्रचार सुरू आहे. यामागे बाबासाहेबांच्या योगदानाला कमी लेखण्याचा आणि मनुवादी विचारसरणीचा डाव आहे. पण बहुजन जनता आता जागृत आहे. संविधान हे बाबासाहेबांचे प्रेरित कार्य आहे आणि त्यावर कोणीही सावली टाकू शकत नाही.
बाबासाहेबांनी दिलेले हक्क आता बहुजन समाज हिसकावून घेण्यासाठी सज्ज झाला आहे. बी.एन. राव समर्थकांचे खरे स्वरूप समजले असून, त्यांच्या कपटकारस्थानांना बळी न पडण्याचा इशारा या निमित्ताने बहुजन समाजाने द्यावा.
जय भारत! जय संविधान!
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे सर
जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522.



Post a Comment
0 Comments