वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
रामचंद्र नावकार
बाळापूर (जि. अकोला) :
दि. 01 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा लहुसेना फाउंडेशनच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देशी व विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. महिलांनी आपल्या निवेदनात सांगितले की, अण्णाभाऊ साठे हे सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत होते. त्यांच्या जयंतीच्या दिवशी दारू विक्री सुरू राहणे हे त्यांच्या विचारांचा अपमान ठरेल.
निवेदन देणाऱ्या महिलांमध्ये सुनंदा ताई चांदणे, उमाताई अंभोरे, यशोदाबाई गायकवाड, शकुंतला जाधव, पुष्पाताई अंभोरे, सविता गायकवाड आणि अनिता गायकवाड यांचा समावेश होता.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे सर
जाहिरातीसाठी संपर्क करा : 8830708522



Post a Comment
0 Comments