Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

शिवनी विमानतळाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाव द्या : डॉ. रामकृष्ण डोंगरे"

 

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना परिवर्तन युवक संघटनेची निवेदनाद्वारे मागणी.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

रामचंद्र नावकार

अकोला :- भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे मूर्त स्वरूप ठरलेले क्रांतिकारी लोकशाहीर, विचारवंत, साहित्यिक आणि समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव अकोल्यातील शिवनी विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून होत आहे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी मागणी देखील परिवर्तन परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामकृष्ण डोंगरे ( साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ) हे गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केंद्र शासनाकडे व महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. तसेच ग्रामीण व शहरी भागात स्वाक्षरी अभियान राबवून अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावी याकरिता प्रवास प्रबोधनाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मी केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून डॉ. डोंगरे हे करीत आहेत याच मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामकृष्ण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.यावेळी सचिन वारके, स्वप्निल अढाऊ, आकाश नावकर, विठ्ठल पांढरे, संतोष आगवणे, शुभम अढाऊ, विनोद डोगरे , पृमोद अढाऊ, सावंतकुमार खाडे, सह आधी उपस्थित होते,  



चौकट :


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते. त्यांनी आपल्या शाहिरी, लेखन, लोकनाट्य आणि कथनशैलीद्वारे सामाजिक क्रांतीचा दीप पेटवला. ‘फकिरा’, ‘झुंड’, वारणेचा वाघ, ‘माझी मैना’ यासारख्या त्यांच्या साहित्य संपदा आजही शोषित, वंचित आणि श्रमिक वर्गासाठी प्रेरणादायी ठरतात. अण्णाभाऊ साठे यांनी मोजकेच औपचारिक शिक्षण घेतले असतानाही ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य, ७ चित्रपटांच्या कथा, प्रवासवर्णन, कविता संग्रह, पोवाडे आणि अनेक शाहिरी रचना केली. त्यांच्या साहित्याचे २७ देशांमध्ये अनुवाद झाले असून विशेषत: रशियन ग्रंथालयांमध्ये त्यांच्या साहित्याला मानाचे स्थान आहे. तसेच अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती ‘शिवाजी महाराजांचे गड किल्ले’ या विषयावर पोवाडा सुद्धा रचला आहे. ते केवळ साहित्यिकच नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय होते. त्यांनी श्रमिक आणि कष्टकरी समाजासाठी आपल्या लेखणीने न्यायाचा आवाज बुलंद केला असल्याचे परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामकृष्ण डोंगरे यांनी निवेदन सादर करत असताना सांगितले.




Post a Comment

0 Comments