वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्युज ✍🏻
📍भांडुप
भांडुप एस विभाग महापालिकेच्या लगतच्या रोडवर महापालिका रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये फुले, हार, बीएमसी नावाच्या होड्या सोडून रस्त्याच्या दुरावस्थेचे निषेध करण्यात आला.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मुंबई खड्डेमय रस्त्याच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले.
हे खड्डेमय रोड फक्त भांडुप मध्ये नसून संपूर्ण मुंबईत आहेत. आजचे प्राथमिक आंदोलन हे संपूर्ण मुंबईत महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. महिन्याभरात खड्डे बुजवण्याचं काम महापालिका च्या वतीने नाही झाले तर यांच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यात घालण्याच काम वंचितच्या वतीने केल जाईल.
वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या प्रमुख नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या मुंबई सदस्य काजल वानखेडे, रंजना कांबळे, कमल गायकवाड , सीमा इंगळे , राजकन्या सरदार, कविता गायकवाड, भारती मोरे तसेच इतर महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments